वृक्षप्रतिज्ञा घेऊन होणार वृक्ष लागवड!
By admin | Published: July 1, 2016 12:13 AM2016-07-01T00:13:18+5:302016-07-01T00:13:18+5:30
बुलडाणा येथील लागवड अधिकारी संतोष लांडे यांनी ही वृक्ष प्रतिज्ञा तयार केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ई-क्लासच्या जमिनीवर जाळला, उर्वरित आज जाळणार
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी पाच गोदामांतून ९० लाख रुपयांचा जप्त केलेला चार ट्रक गुटखा नागपूर महामार्गलगतच्या पिंपळविहीर येथील ई-क्लास जमिनीवर गुरुवारी जाळण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. गोदामातील उर्वरित गुटखा शुक्रवारी नष्ट केला जाणार आहे.
महसूल आणि अन्न, औषध प्रशासनाने येथील जाफरजीन प्लॉट स्थित अग्रवाल टॉवरमध्ये धाडसत्र राबवून पाच गोदामात गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी ते मंगळवारी सील केले होेते. शहरात गुटखा विक्री होत असल्याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना पुढाकार घ्यावा लागला. महसूलचे अधिकारी त्यासाठी कामी लावावे लागले. पाच गोदामात ९० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेऊन सील करण्यात आला. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र पंचनामा करून ताब्यात घेतलेल्या गुटख्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुरेश बगळे यांच्यावर विशेषत्वाने जबाबदारी दिली आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून चार ट्रक महसूल विभागाने मागविले. जिल्हाधिकारी गित्ते यांनी अन्न, औषध प्रशासनाला गुटखा नष्ट करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना दिली. गुटखा, पानमसाला विक्रीवर बंदी असताना तो शहरात येतो कसा? याचे चिंतन अन्न, औषध प्रशासनाला करावे लागणार आहे. शहरात गुटखा विक्री सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना शोधता आले, तर ‘एफडीए’ला आजतागायत ते का दिसले नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे गुटखा विक्रीत ‘एफडीए’ सहभागी असल्याचे आता स्पष्ट होते. पाच गोदामात ९० लाख रुपये किमतीचा गुटखा साठा आढळून आला. गुटखा तस्करीतून दरदिवसाला कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते. तहसीलदार बगळे, परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी मेश्राम, एफडीएचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्यासह सहकार्यांनी गुरुवारी सायंकाळी जाफरजीन प्लॉट स्थित अग्रवाल टॉवरमध्ये सील केलेला पाच गोदामातील गुटखा नष्ट केला.
एफडीए संशयाच्या भोवऱ्यात
विदर्भात गुटखा विक्रीचे प्रमुख केंद्र अमरावती उदयास आले असताना अन्न, औषध प्रशासनाकडून ठोस कारवाई यापूर्वी कधीही करण्यात आली नाही. मात्र जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुटखा विक्री रोखण्यासाठी पुढाकार घेताच तब्बल ९० लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात महसूल विभागाला यश आले आहे. त्यामुळे एफडीए विभाग केवळ नावापुरतेच कार्यरत असून गुटखा विक्रीमुळे हा विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
दोन ट्रक गुटखा शुक्रवारी जाळणार
महसूल, अन्न व औषध प्रशासनाने पाच गोदामातून ९० लाख रुपये किंमतीचा ताब्यात घेतलेला चार ट्रक गुटखा गुरुवारी जाळण्यात आला असला तरी उर्वरित दोन ट्रक गुटखा शुक्रवारी जाळण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुटखा शास्त्रोक्त पद्धतीने जाळण्यावर भर दिला जात असून प्रदूषण होणार नाही, हे कटाक्ष पाळण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष जाळला गुटखा
पाच गोदामातून ताब्यात घेण्यात आलेला ९० लाख रुपयांचा गुटखा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समक्ष जाळण्यात आला. नागपूर महामार्गालगतच्या पिंपळविहीर येथील ई- क्लास जमिनीवर गुटखा जाळून तो नष्ट करण्यात आला. यावेळी तहसीलदार सुरेश बगळे, एफडीएचे सह. आयुक्त मिलिंद देशपांडे, परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी मेश्राम यांनी उपस्थित होते. एकाच वेळी ९० लाख रुपयांचा गुटखा पकडून तो जाळल्याची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.