निर्गुणा नदीच्या परिसरात युवकांकडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:24+5:302021-08-23T04:22:24+5:30
दिवसेंदिवस झाडाची वृक्षतोड मुळे झाडाची संख्या कमी झाली. नदीच्या काठावरील मातीचा निचरा होऊन काठ निकामी होत आहे. हा काठ ...
दिवसेंदिवस झाडाची वृक्षतोड मुळे झाडाची संख्या कमी झाली. नदीच्या काठावरील मातीचा निचरा होऊन काठ निकामी होत आहे. हा काठ व्यवस्थित राहावा, या ठिकाणी वडाच्या झाडांच्या कलम खड्डे करून लावण्यात आले आहे. गावातील कोतवाल कपिल ताले, श्याम ताले यांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण करण्यात आले आहे.
-------------------
शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन
अकोटः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यपीठांतर्गत संलग्नित सुमित्रा बाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला येथील अंतिम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनी स्नेहल प्रदीपराव पाथरे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील बोर्डी गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांना माती परीक्षणाचे प्रत्यक्षिक करून दाखविले. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे असे सांगितले. महाविद्यालय प्राचार्य डॉ. राम खरडे, विषय तज्ज्ञ व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्याचे अधिकारी प्रा. गोपाल बेद्रे यांच्या मार्गदर्शनात माती परीक्षण केले. यावेळी संदीप महाले, संजय ताडे, विशाल वरणकार, सुधीर बुंदे, गौरव महाले, नारायण भाळतीलक, शंकर पोटे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (फोटो)