अकोल्यात रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोडणी
By admin | Published: July 11, 2017 03:00 PM2017-07-11T15:00:53+5:302017-07-11T15:45:41+5:30
अकोल्यातील तुकाराम चौकाकडे जाणा-या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू होत आहे. त्यासाठी अडसर ठरणा-या विजेच्या खांबांना हलवण्याचे आणि मार्गात येणा-या झाडांची तोडणी सुरू आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 11 - अकोल्यातील तुकाराम चौकाकडे जाणा-या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू होत आहे. त्यासाठी अडसर ठरणा-या विजेच्या खांबांना हलवण्याचे आणि मार्गात येणा-या झाडांची तोडणी सुरू आहे.
नेहरूपार्क ते तुकाराम चौकापर्यंतच्या मार्गाचे काँक्रिटीकरण आणि रूंदीकरण होत आहे. बॉटलनेकचा भाग सोडला तर नेहरूपार्क ते गोरक्षण संस्थानच्या समोरचा मार्ग पहिल्या टप्प्यात पूर्णत्वास येत आहे. आता पुढे रमाकांत खेतान परिवाराच्या चार बंगल्या समोरच्या वृक्षांचा कटाई करण्यात आली.
सहकार नगर चौकात आणि सुरेंद्र विसपुते यांच्या दुकानसमोरची अनेक वर्ष जुने वृक्ष तोडले गेले. अनेक वर्षांपासून नागरिकांना सावली देणा-या वृक्षांचा कटाई झाल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. मार्ग रूंदीकरणाच्या कामात जेवढी वृक्ष कटाई होत असेल त्यापेक्षा जास्त रोप लावण्याचा संकल्प महापालिका आणि परिसरातील नागरिकांना घ्यावा, असे आवाहन वृक्ष संवर्धन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.