झाडांचीही चोरी झाली!

By admin | Published: July 13, 2016 01:52 AM2016-07-13T01:52:02+5:302016-07-13T01:52:02+5:30

सीसी फुटेजमध्ये चोरी उघड.

The trees were also stolen! | झाडांचीही चोरी झाली!

झाडांचीही चोरी झाली!

Next

अकोला : अकोल्यात चोरी होणे ही गोष्ट आता नवीन नाही. येथील कायदा व व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणार्‍या चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात, यावेळी मात्र एक आगळी-वेगळी चोरी झाली आहे. चोरट्याने कोणतेही पैसे, सोनं असा ऐवज किंवा मुद्देमालाची चोरी केली नाहीये, तर एका ह्यपॉश चोरट्याने चक्क झाडांचीच चोरी केली आहे.
गोरक्षण मार्गावर असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ प्रा. सचिन बुरघाटे यांच्या ह्यअस्पायर ट्रेनिंग आणि व्यक्तिमत्त्व विकास संस्थेतील झाडे चोरीला गेली आहेत. ही सर्व चोरीची घटना सीसी कॅमेर्‍यामध्ये कैद झाली असून, शनिवारी रात्री बाराच्या सुमारास चोरट्याने हात साफ केला आहे. सीसी फुटेजनुसार शनिवारी रात्री चोरटा आपल्या दुचाकीने संस्थेमध्ये दाखल झाला व बारा मिनिटात चारदा चार झाडे चोरून नेली. यातील एक झाड अतिशय महागड्या अशा जातीचे असून, त्याची किंमत नऊ हजारांवर असल्याची माहिती आहे. या प्रकरणात प्रा. सचिन बुरघाटे यांनी पोलीस तक्रार दिली नसली, तरी चोरी कशाचीही होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The trees were also stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.