खाई नदीचे साैंदर्यीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:33+5:302021-01-09T04:15:33+5:30
अकाेला: अकाेट शहरातील सांडपाणी खाई नदीत जाते. ते थांबून सदर पाण्याची प्रक्रिया आणि नदीचे साैंदर्यीकरण करण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू ...
अकाेला: अकाेट शहरातील सांडपाणी खाई नदीत जाते. ते थांबून सदर पाण्याची प्रक्रिया आणि नदीचे साैंदर्यीकरण करण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा यंत्रणेला निर्देश दिले आहे. मंगळवारी त्यांनी नदीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
तलाठ्याचा अहवाल जिल्हाधिका-याकडे
अकाेला: अडगाव बु. येथील तलाठी केशव इंगळे यांने मतदारयादीत फेरफार केल्याच्या संशयावरून पंकज देशमुख यांनी तक्रार केली हाेती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. संबंधित तलाठ्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण दिल्याची माहिती असून नजर चुकीने हा प्रकार घडल्याचे नमूद केले आहे.
वाॅर्ड घाेटाळा; अधिकाऱ्यांना जबाबदार धरा
अकाेला: व्याळा ग्रामपंचायतमध्ये सदाेष वाॅर्ड रचना आढळून आल्याने या प्रकारणात जबाबदार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्यात येऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पाताेडे यांनी केले आहे. यांनी पत्रकात नमूद केले आहे, की या प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय दिल्या जात असल्याचा आराेप पत्रकात केले आहे.
माेहरीदेवी कन्या विद्यालयात शिक्षक दिन
अकाेला: माेहरीदेवी कन्या विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आभासी पद्धतीने विद्यार्थिनी सहभागी झाल्या हाेत्या. यावेळी मुख्याध्यापिका रसिका वाजगे यांनी मागर्गदर्शन केले.
दुचाकी चाेरी प्रकरणी गुन्हा दाखल
अकाेला: बाळापूर येथील पवन दिलीप तायडे यांची दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी ३ जानेवारी राेजी चाेरून नेली हाेती. या प्रकरणात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर दुचाकी चाेरीच्या घटना वाढल्या आहे.
भाजप सोशल मीडिया संयोजकपदी अक्षय जोशी
अकोला : भारतीय जनता पक्ष महानगराच्या सोशल मीडिया संयोजक म्हणून अक्षय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या हस्ते शुक्रवारी त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, गिरीश जोशी, सोशल मीडिया ग्रामीण अध्यक्ष मोहन पारधी, संजय जिरापुरे, माधव मानकर, रमेश अप्पा खोपरे, संजय गोडा, वसंत बाछुका नीलेश निनोरे, जयंत मसने, श्रीराम देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
थॅलेसिमिया साेसायटीच्या वतीने रक्तदान
अकाेला: अकाेला थॅलेसिमिया साेसायटीच्या वतीने धामणगाव बाेथमारे येथे रक्तदान शिबिर आयाेजित केले हाेते. यावेळी अश्वीन पाेपट, दीपक भानूशालू, राहुल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. शिबिरासाठी डाॅ. हबीद हुसैन यांची मदत झाली.
ट्रान्सपाेर्ट आघाडी अध्यक्षपदी शर्मा
अकाेला: महानगर भाजप ट्रान्सपाेर्ट आघाडीच्या अध्यक्षपदी राजू बालाजी शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे महानगरध्यक्ष विजय अग्रवाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या हस्ते शर्मा यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.