आदिवासी ग्रामस्थांनी कोरोनाला रोखले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:58+5:302021-06-09T04:23:58+5:30
बार्शिटाकळी : प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजना, कडक निर्बंध लागू असतानासुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. अनेक ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार ...
बार्शिटाकळी : प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजना, कडक निर्बंध लागू असतानासुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. अनेक ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपाययोजनांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याचे यशस्वी प्रयत्न केले. यापैकीच बार्शिटाकळी तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या जांबवसू गट ग्रामपंचायतीने कोरोनाला हद्दपार केले आहे.
जांबवसू, खडकी, मांडोली, मुंगसाजी नगर या गावातील आदिवासी ग्रामस्थांनी कोरोनाला हुसकावून लावले. सध्या या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तीनही गावात फक्त एकच रुग्ण ॲक्टिव्ह असल्याचे समजते. १४००च्या वर आदिवासी ग्रामस्थ हे काही शेतकरी तर काही मजूर वर्गात मोडत असून, मजूर हे शेतात व गावातच गोळंबी काढण्याचा व्यवसाय व शेतीकाम करतात. शेतकरी मात्र आपल्या शेतात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच, रवींद्र राठोड, ग्रामसेविका विद्या गायकवाड, अंगणवाडीसेविका,आशा वर्कर संगीता कांबळे, कृषी सहाय्यक अरखराव, तलाठी वनिता चव्हाण, आरोग्यसेवक आदींकडून ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधासाठी वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
फोटो:
कोरोना महामारीला वेशीवर रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रतिबंधित उपाययोजना करून यश मिळविले. याकरिता ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य केले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळाले.
- रवींद्र राठोड, सरपंच, जांबवसू