दिलीपकुमार यांना 'अकोल्याच्या जत्रे'ची स्वरश्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:51+5:302021-07-14T04:21:51+5:30
प्रास्ताविक व अकोल्याच्या जत्रेची भूमिका राजश्री देशमुख यांनी मांडली, तर दिलीपकुमार यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगत अत्यंत बहारदार निवेदन ...
प्रास्ताविक व अकोल्याच्या जत्रेची भूमिका राजश्री देशमुख यांनी मांडली, तर दिलीपकुमार यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगत अत्यंत बहारदार निवेदन डॉ. प्रवीण देशमुख यांनी केले. आनंद जहागीरदार, नाना भडके, मदन खुणे, तनुश्री भालेराव या गायक कलावंतांनी या कार्यक्रमात एकाहून एक सरस गाणी सादर करून जत्रेला मंत्रमुग्ध केले. राजू बुडखले यांनी तांत्रिक सहाय्य केले. कार्यक्रमाची सांगता 'दिल दिया है जानभी देंगे' या देशभक्तीपर गीताने करण्यात आली.
फाेटाे आहे
..............................
स्वावलंबी विद्यालयात संस्कारक्षम विद्यार्थी घडले
अकाेला : आजच्या स्पर्धेच्या युगात एक संस्कारक्षम व अनुशासित विद्यार्थी घडविण्यात स्वावलंबी शाळेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे उद्गार माजी गृहराज्यमंत्री व माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी काढले. त्यांनी स्वावलंबी विद्यालयात सदिच्छा भेट दिली व कोरोना संक्रमण काळात शाळेकडून दिल्या जाणाऱ्या
निशुल्क ऑनलाईन शिक्षणाचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक हरीश शर्मा व पर्यवेक्षिका सीमा पाण्डे उपस्थित होते.
.............
अभाविपकडून महानगरपालिकेला स्वच्छतेचे धडे!
अकाेला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महापाैर अर्चना मसने यांना निवेदन देऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. विदर्भ प्रांत सहमंत्री अभिषेक देवर, महानगर सहमंत्री आदित्य केंदळे, कार्यालय व कोष प्रमुख देवाशिष गोतरकर, दर्शन अग्रवाल, अनिकेत पजई, मयुरेश हुशे, आदित्य पवार, उन्नत दातकर, मनोज साबळे आदी कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की शहरातील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे रस्ते एखाद्या तलावासारखे दिसत आहेत. त्यावर काही उपाययोजना करण्यात यावी. नवीन बांधलेल्या रस्त्यांवरसुद्धा खड्डे पडले आहेत. महानगरपालिकेने या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना महानगरपालिकेतील यापुढील कुठलेच काम देऊ नये. टिळक मार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. त्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा अभाविप महानगरपालिका विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारासुद्धा विद्यार्थी परिषदेने दिला आहे.
फाेटाे
.........................................
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत
अकोला : अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील विशाल महादेव राऊत (३२) या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व लॉकडाऊनमध्ये रोजगार बंद झाल्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला "नाम फाऊंडेशन" या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सानुग्रह मदत म्हणून १५ हजार रुपयांचा धनादेश त्यांची पत्नी शारदा राऊत यांच्याकडे देण्यात आला. ही मदत नाम फाऊंडेशन विदर्भ व खान्देशचे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ. रामेश्वर बरगट, गावचे उपसरपंच प्रशांत नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.
...........................