निर्भयाला श्रद्धांजली; सकल मराठा समाजातर्फे कॅन्डल मार्च
By admin | Published: July 14, 2017 01:28 AM2017-07-14T01:28:43+5:302017-07-14T01:28:43+5:30
कोपर्डी घटनेतील दोषींना शिक्षा द्या : शेकडो समाज बांधवांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोपर्डी येथील निर्भयावर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केली. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी सायंकाळी हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकातील स्व. ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याजवळून कॅन्डल मार्च काढण्यात आला. कॅन्डल मार्चमध्ये शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शासनाने आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली नाही. जलदगती न्यायालयात खटला चालवून निर्भयाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते; परंतु या आश्वासनाचा शासनाला विसर पडला. मृत्यूनंतरही निर्भया आणि तिच्या कुटुंबाला शासनाकडून न्याय मिळाला नाही. कोपर्डी येथील निर्भयावर झालेल्या अत्याचाराला १३ जुलै रोजी वर्ष पूर्ण झाले. अजूनही या घटनेची धग कायम आहे. गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. कॅन्डल मार्चच्या अग्रस्थानी चिमुकल्या मुलींसह महिला होत्या. कॅन्डल मार्च हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकातून मार्गक्रमण करीत कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बागेसमोर आल्यानंतर सकल मराठा समाजाच्यावतीने निर्भयाला आदरांजली अर्पित करण्यात आली. कॅन्डल मार्चमध्ये सकल मराठा समाजातील महिला, युवती, युवक, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘कोपर्डी’च्या अत्याचाऱ्यांना त्वरित फासावर लटकवा!
- कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करू न तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्याच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्षाचा कालावधी झाला आहे; परंतु हे कृत्य करणारे पप्पु शिंदे , संतोष भवाळ, नितीन भैमुले या नराधमांना शिक्षा झाली नाही.
- शासनाने सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित निकाली काढावा व या तिघांना फाशीचीच शिक्षा मिळावी, अशा आशयाचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात या खटल्यातील साक्षीदारांना शासनाने पोलीस सरंक्षण द्यावे व कोपर्डी गावातील भीतीचे वातावरण दूर करावे,अशीही मागणी छावाने केली आहे. सदर निवेदन देताना छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोेडे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप खाडे, मनीराम ताले, अविनाश पाटील, रजनिश ठाकरे, सुरेश गाढे, अरविंद कपले, संतोष भिसे, संतोष ढोरे, अमोल पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब लाहोळे, गोपाळराव गालट, डॉ. अमोल रावणकर, डॉ. रणजित कोरडे, गजानन पुंडकर, सुनील जानोरकर, चंद्रकांत पाटील, विक्की दांदळे, पीयूष तिरू ख, मंसाराम मेटांगे, अनिरुद्ध भाजीपाले, ब्रम्हा भाकरे,अनिल बोर्डे, मनोहर मांगटे, धनराज लाहोळे, विभा राऊत, भारती देशमुख, रवींद्र मानकर, दिनेश खडसे,अनुराधा कडू,कविता चौधरी, किरण कडू,अलकनंदा खर्चे,अर्चना गावंडे, संगीता देशमुख, वर्षा बडगुजर आदींसह कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
त्वरित निर्णय व्हावा! - महिला राकाँ
- अकोला महानगर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोपर्डी प्रकरणात ताबडतोब निर्णय व्हावा, अशी मागणी केली.
- कोपर्डी बलात्कार आणि हत्या तसेच महिला अत्याचारातील आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्व प्रकरणातील आरोपींवर त्वरित खटले दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा दिली जावी, असेही निवेदनात नमूद आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी कोपर्डीतील पीडित निर्भयाला श्रद्धांजली वाहिली. निवेदन देतेवेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. आशा मिरगे, महानगर महिला अध्यक्ष मंदा देशमुख, कीर्ती नवलकार, अख्तर बेगम, लीना मोहड, लक्ष्मी बोरकर, माया ठाकूर, नाझमा परवीन, जया शुक्ला, नलिनी भारती, सीमा जाधव, पुष्पा भाकरे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.