अकोट येथे ‘त्या’ तिघांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:42+5:302020-12-14T04:32:42+5:30

अकोटः माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तींना अचानक मागून आलेल्या चारचाकीने धडक दिली. या धडकेत गजानन नेमाडे, उत्तम नाठे, शालिग्राम राऊत ...

Tribute to 'those' three at Akot | अकोट येथे ‘त्या’ तिघांना श्रद्धांजली

अकोट येथे ‘त्या’ तिघांना श्रद्धांजली

Next

अकोटः माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तींना अचानक मागून आलेल्या चारचाकीने धडक दिली. या धडकेत गजानन नेमाडे, उत्तम नाठे, शालिग्राम राऊत यांचा मृत्यू झाला. त्यांना अकोट येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, युवासेना विस्तारक राहुल कराळे, शहरप्रमुख सुनील रंधे, तालुकाप्रमुख शाम गावंडे, कुणाल कुलट, सुभाष सुरतने, गोपाल कावरे, रोशन पर्वतकर, विजय ढेपे, डॉ. प्रशांत अढाऊ, शिवा गोटे, संजय भट्टी, विजू अंभोरे, गोविंद चावरे, कमल भास्कर, राजेंद्र मोरे, मुरलीधर खोटे, प्रशांत रनगिरे, गजानन सातपुते,रणजित कहार, उमेश आवारे, सोपान साबळे, प्रशांत येऊल, रमेश खिरकर, दीपक रेखाते, विलास ठाकरे, वासुदेव गावंडे, चंडकिशोर तायडे, विक्रम मोडक, विशाल काकड, देवा मोरे, गजानन भंगाळे, राजू ठाकूर,अनिल वानखडे, गजानन सोळंके यावेळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

----------------------

नगरसेवक ओम सुईवाल यांचा राजीनामा

तेल्हारा: येथील नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत नगरसेवक ओम सुईवाल यांनी कार्यकाळ पूर्ण करीत नगरसेवक पदाचा राजीनामा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांच्याकडे दिला आहे.

-------------------------

गोपीनाथ मुंडे जयंती साजरी

आलेगाव: येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे गोपीनाथ मुंडे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराम कापकर होते. कार्यक्रमाला मंगेश मुर्तडकर, विश्वासराव खुळे, नीलेश कापकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार गणेश काठोळे यांनी मानले. कार्यक्रमाला विनोदभाऊ काठोळे, धीरज कापकर, नीलेश काळदाते, रामजी काठोळे, बंडूभाऊ कंटाळे(सरपंच) नवलकिशोर काठोळे, संजय गावडे, योगेश कापकर आदी उपस्थित होते.

---------------------------------

मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

अकोटः दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने केलपाणी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामूहिक अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी मनीष कराळे, वसंतराव पाळोदे, माणिकराव सोनोने, संभाजी लटपटे, विनायक मुंडे, अर्जुन तेलगोटे, बालाजी होळंबे, दत्ता आंधळे, विठ्ठल नागरगोजे, अर्जुन मुंडे, भागवत मुंडे, बालाजी सोनोने, सिद्धेश्वर होळंबे आदी उपस्थित होते.

----------------------

एसटी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी

अकोटः अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील ग्रामपंचायत सदस्य पदाचे एसटी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून एसबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू करणे बाबतचे निवेदन तहसीलदार यांना युवा महर्षी वाल्मीकी मंडळाच्या वतीने देण्यात आले.

वडाळी देशमुख या गावामध्ये एसटी प्रवर्गाचे फक्त एकच घर असून त्या घरामध्ये तीन मतदार हा आमच्यावर झालेला राजकीय अन्याय आहे. तेव्हा आम्हाला एक तर एसटी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र देण्यात यावे किंवा आरक्षण रद्द करून एसबीसी आरक्षण लागू करा अन्यथा आंदोलन व उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.

Web Title: Tribute to 'those' three at Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.