खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग; ३१ जानेवारी ठरणार खगोलप्रेमींसाठी पर्वणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:16 AM2018-01-31T01:16:48+5:302018-01-31T01:16:59+5:30
अकोला : खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आज बुधवारी, ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आज बुधवारी, ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. ‘सुपरमून’ हे नाव रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये दिले होते. अशा वेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३0 टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार, ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५९ हजार किलोमीटर अंतरावर येईल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसेल.
दुसरीकडे एका इंग्रजी महिन्यात ज्या वेळी दोन पौर्णिमा येतात, त्या वेळी दुसर्या पौर्णिमेच्या चंद्रास ह्यब्ल्यूमून म्हणतात. जरी त्याला ‘ब्ल्यूमून’ म्हटले गेले असले, तरी त्या वेळी चंद्र काही ‘ब्ल्यू’ रंगाचा दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ म्हटले आहे. याचप्रमाणे बुधवार, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहणदेखील आहे. भारतातून ते खग्रास स्थितीत दिसेल.
अशा प्रकारे बुधवार, ३१ जानेवारी रोजी ‘खग्रास चंद्रग्रहण’, ‘सुपरमून’ आणि ‘ब्ल्यूमून’ असा तिहेरी योग आला आहे. म्हणून खगोलप्रेमींच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे. छायाचित्रकारांनादेखील ही एक मौल्यवान संधी आहे.
गायगाव येथे चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी
ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी नागरिकांना गायगाव येथील निसर्ग अभ्यास केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी अत्याधुनिक साधनाद्वारे चंद्रग्रहण पाहता येईल. नागरिक, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रभाकर दोड यांनी कळविले.
यावेळी घेता येईल अनोखे दर्शन
अकोल्यात हे चंद्रग्रहण सायंकाळी 5.15 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत दिसेल.
हे ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे. म्हणजे चंद्राला आधीच ग्रहण लागलेलं असेल. १५२ वर्षांनंतर हा योग आला आहे. पृथ्वीजवळ आल्यावर चंद्राला सुपरमून म्हणतात. चंद्राचा १४ टक्के आर मोठा दिसतो आणि ३0 टक्के अधिक प्रकाशमान दिसतो.
- प्रभाकर दोड,
खगोलशास्त्र अभ्यासक.