वनपाल बदली प्रकरणी वरिष्ठांची टोलवाटोलवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:13+5:302021-07-08T04:14:13+5:30

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत तत्कालीन वनपाल एस. पी. राऊत यांची एक वेळा प्रशासकीय तर एकाच दिवशी दोन ...

Troubling of seniors in forester transfer case! | वनपाल बदली प्रकरणी वरिष्ठांची टोलवाटोलवी!

वनपाल बदली प्रकरणी वरिष्ठांची टोलवाटोलवी!

Next

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत तत्कालीन वनपाल एस. पी. राऊत यांची एक वेळा प्रशासकीय तर एकाच दिवशी दोन वेळा विनंतीवरून बदली झाल्याच्या प्रकरणी कारवाईसाठी वनविभागाच्या वरिष्ठ स्तरावरून टोलवाटोलवी केल्या जात असल्याचा आरोप तक्रारदार गोपाल राठोड यांच्याकडून करण्यात येत आहे. तत्कालीन वनपाल एस. पी. राऊत यांची दिनांक ८ ऑगस्ट २०२० रोजी बार्शीटाकळी वर्तुळातून कोलकास संकुल सेमाडोह परिक्षेत्र उपवनसंरक्षक सिपना(वन्यजीव)विभाग परतवाडा येथे प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली. ही बदली मुख्य वनसंरक्षक (प्रा)अमरावती यांच्या आदेशाने करण्यात आली. त्यानंतर लगेच ही बदली रद्द करून विनंतीनुसार रिक्त पदावर उपवनसंरक्षक(प्रा)अकोला मधील चिखलवाल वर्तुळात दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी बदली करण्यात करण्यात आली. याच दिवशी मुख्य वनसंरक्षक(प्रा) अमरावती यांनी चिखलवाल वर्तुळ वरून मूर्तिजापूर वर्तुळात बदली केली. हे गंभीर बदली प्रकरण माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर तक्रारकर्ता गोपाल चरणदास राठोड यांनी मुख्यमंत्री व संबंधित वनविभागाकडे ३१ मार्च २०२१ रोजी तक्रार केली. या प्रकरणात अनियमितता करणारे एम. एस. रेड्डी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, डॉ. प्रवीण कुमार चव्हाण तत्कालीन मुख्य वनसंरक्षक अमरावती, विजय माने तत्कालीन प्रभारी उपवनसंरक्षक(प्रा) अकोला, एस. पी. राऊत वनपाल मूर्तिजापूर वर्तुळ यांचे विरुद्ध सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रार कर्त्याने केली आहे.

बदली प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयाच्या मेलवर!

एकाच वनपालच्या तीन वेळा झालेल्या या गंभीर बदली प्रकरणाची माहिती व तक्रार अर्जाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाच्या मेलवर तक्रारकर्त्याने पाठविली असून कोरोना संसर्गामुळे व मनुष्यबळ कमी असल्याने या प्रकरणाचा पाठपुरावा झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. २१ जून रोजी तक्रारकर्त्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला असता, या प्रकरणाची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

मी या प्रकरणी वनविभागाचे संबंधित कार्यालयाकडे व मुख्यमंत्री कार्यालय स्तरावर माहिती विचारली असता चौकशी सुरू आहे असे सांगितले जात आहे. कारवाई मात्र अद्यापही झाली नाही.

-गोपाल चरणदास राठोड, तक्रारदार )

बदली प्रकरणाची चौकशी करण्यात आली की नाही. याबाबत सत्यता पडताळणी करून माहिती देण्यात येईल.

-श्री. लक्ष्मी. डीवायसीसीएफ नागपूर

Web Title: Troubling of seniors in forester transfer case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.