राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:30 PM2017-11-22T20:30:26+5:302017-11-22T20:35:07+5:30
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यावर २२ नोव्हेंबरच्या सकाळी ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. या अपघाताबाबत कारचालकाच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू (अकोला): राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यावर २२ नोव्हेंबरच्या सकाळी ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. या अपघाताबाबत कारचालकाच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव बस थांब्यावर बुधवारी सकाळी अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जात असलेली एम.एच ३0 ए.ए. ११0१ क्रमांकाच्या कारमधून अकोला रहिवाशी लखानी कुटुंब प्रवास करीत असताना मूर्तिजापूरकडून येणार्या ओ.आर.१५ एस. ५३९१ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात सदर कारवर आदळला. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात पडली. या अपघातामध्ये मोहम्मद जुनेद लखानी, सोहेल लखानी, इकबाल बानो मोहम्मद जुनेद लखानी सर्व राहणार अकोला हे जखमी झाले. सदर जखमींना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून, पोलिसांनी लखानी यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.