ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By Admin | Published: August 17, 2016 12:12 AM2016-08-17T00:12:40+5:302016-08-17T00:12:40+5:30

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरठी येथील वैभव मेश्राम (१८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Truck bikes hit; One killed | ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

googlenewsNext

वरठी मार्गावरील घटना : जखमीला नागपूरला हलविले
वरठी : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरठी येथील वैभव मेश्राम (१८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जख्मीना नागपुरला हलवण्यात आले आहे. सदर घटना काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भंडारा टाकळी मार्गावर घडली.
माहीतीनुसार वैभव मेश्राम, समीर नागदेवे आणि विनय नादुंरकर वरठी येथुन ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून दुचाकी (एमएच ३६ डी २२३७) ने रावणवाडी येथे गेले होते. त्यांच्यासोबत वरठी येथील अन्य युवकही आपआपल्या वाहनाने गेले होते. दरम्यान रावनवाडी येथुन परत येत असताना टाकळी जवळ भरधाव ट्रकला ओवरटेक करण्याच्या नादात त्या मागे भरधाव येणाऱ्या ट्रक ने त्यांना जोरदार धडक दिली. यात गांधी वार्ड वरठी येथील वैभव मेश्राम (१८) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुचाकी चालक समीर नागदेवे (१८) व विनय नादुंरकर यांना गंभीर दुखापत झाली. ट्रक चा क्रमाक (एमपी-२० एलएचपी-२१०५) होता. वरठी येथील काही युवकांनी अम्बुलंस च्या मदतीने तत्काळ भंडारा शासकीय रुग्णालयात हलवले. समीर व विनय यांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना नागपुरला हलवण्यात आले. दोघापैकी विजय ची प्रकृती धोक्याबाहेर असुन समीर ची प्रकृती चिंताजनक आहे. मृतक वैभव व जखमी समीर हे जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीचे विद्यार्थी होत.(वार्ताहर

तिघेही कमावून शिकणारे
अपघात ग्रस्त तिघेही युवकांच्या घरची परीस्थिती हलाखीची आहे. मृतक वैभव ला वडील नाहीत. आईने मोलमजुरी करून दोन मुले व एक मुलींचा -- केला आहे. जख्मी समीरचे वडील ही मोलमजुरी करतात आणि विजय चे वडील कन्टीन मध्ये का करतात. वभैव आणि विनय गावातच मीळेल ते काम करून कुंटुबाला मदत करत होते. त्याबरोबर त्यांचे शिक्षण सुरु होते. अचानक अपघात झाल्यामुळे त्यांच्या कुंटुबावर आघात झाला.

Web Title: Truck bikes hit; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.