ट्रक नदीत कोसळला;दोघे जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:52 AM2017-08-18T01:52:14+5:302017-08-18T01:52:31+5:30

बोरगाव मंजू /कुरणखेड : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत काटेपूर्णा नदीवरील पुलावरून एक ट्रक २00 फूट खोल नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचालक व वाहक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना  १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

The truck collapsed in the river; both killed on the spot | ट्रक नदीत कोसळला;दोघे जागीच ठार 

ट्रक नदीत कोसळला;दोघे जागीच ठार 

Next
ठळक मुद्देकाटेपूर्णा येथील घटनाट्रकचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू /कुरणखेड : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत काटेपूर्णा नदीवरील पुलावरून एक ट्रक २00 फूट खोल नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचालक व वाहक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना  १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
नाशिकवरून कलकत्ता येथे कांदा पोहोचविण्यासाठी निघालेला एनएल 0२ एल ५९७६ क्रमांकाचा ट्रक १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास अमरावतीच्या दिशेने जात होता. सदर ट्रकचा चालक झोपेच्या धुंदीत असल्याने त्याचे स्टेअरिंग व्हीलवरील नियंत्रण सुटून सदर ट्रक पुलाचे कठडे तोडत २00 फूट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रकचा चुराडा होऊन ट्रकचालक दारासिंग राणा (५२)रा.दिल्ली व वाहक निर्मलसिंग सुरजितसिंग (५0)रा. कलकत्ता हे दोघे जागीच ठार झाले. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.के. काटकर यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेले दोन्ही मृतदेह  महत्प्रयासाने बाहेर काढले. या कामात त्यांना मूर्तिजापूर येथील लंकीभाई यांच्या आपत्कालीन पथकाने सहकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह पोष्टमार्टेमसाठी अकोल्याच्ळा सवरेपचार रुग्णालयात पाठविले. या अपघाताचे वृत्त समजताच अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी अपघाताबाबत मृतकांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. हे वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी या अपघाताबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. पुढील तपास बोरगाव मंजूचे ठाणेदार पी. के. काटकर व पोलीस कर्मचारी करीत आहेत.
-

Web Title: The truck collapsed in the river; both killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.