माना फाट्याजवळ ट्रकची ऑटोला धडक; आठ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:14 AM2018-01-30T01:14:34+5:302018-01-30T01:16:06+5:30

कुरूम : भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्याजवळ २९ जानेवारी रोजी दुपारी घडली.

Truck collapses near Otla; Eight serious | माना फाट्याजवळ ट्रकची ऑटोला धडक; आठ गंभीर

माना फाट्याजवळ ट्रकची ऑटोला धडक; आठ गंभीर

Next
ठळक मुद्देभरधाव ट्रकने ऑटोला दिली धडकचार जण गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आलेमाना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अमरावती जिल्ह्यातील नागझरी येथून ट्रक जप्त केला

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्याजवळ २९ जानेवारी रोजी दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूरवरून मानाकडे जाणारा ऑटो क्र.एमएच ३0 एएफ ५७६ ला अकोलावरून अमरावतीकडे पाइप घेऊन जात असलेल्या ट्रक क्र.आर जे २७ जीए ९७८४ ने जबर धडक दिली. यात ऑटो १५ ते २0 फुटापर्यंत फेकला गेला. या अपघातात ऑटोतील नारायण गरीबा चक्रे , संगीता नारायण चक्रे, वैष्णवी मनोहर आंबीलकर तिन्ही रा.पोही, अताउल्लाह जमादार, प्रिया गोपनारायण, दादाराव पांडुजी कोकणे, महादेव नागोराव बांदेकर, ताराबाई महादेव बांदेकर सर्व रा.माना हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मानाचे ठाणेदार भाऊराव घुगे व त्याचे सहकारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारार्थ हलविले. 
यातील चार जण गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. माना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अमरावती जिल्ह्यातील नागझरी येथून ट्रक जप्त केला. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 

Web Title: Truck collapses near Otla; Eight serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.