ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:46 IST2019-08-24T13:46:53+5:302019-08-24T13:46:58+5:30
दोन्ही चालक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शेगाव टी-पॉइंट या नावाने प्रचलित असलेल्या ठिकाणाजवळ घडली.

ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; दोन ठार
बाळापूर (अकोला) : भरधाव ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शेगाव टी-पॉइंट या नावाने प्रचलित असलेल्या ठिकाणाजवळ घडली. हा अपघात पहाटे ३.३० वाजताचे सुमारास घडला. खामगावहून अकोलाकडे जात असलेल्या एच. आर. ५५व्ही. १३३४ क्रमांकाच्या कंटेनरने विरुद्ध दिशेने येत असलेल्या एम.एच. ४८ बी एम. २५४३ क्रमांकाच्या या ट्रेलर ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ट्रेलर मधील लोखंडी पत्र्याचा गोल ३५ टनाचा रोल ने ट्रेलरच्या कॅबिनचा चुराडा झाला. यामध्ये चालक अस्लम खान हबीब खान (हरयाणा) हा जागीच ठार झाला. तसेच कंटेनरचा चालकही या अपघातात ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन शेळके, यांच्यासह वाहतूक कर्मचारी दाखल झाले. ट्रकखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण अंधार असल्याने त्यात यश आले नाही. अखेर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहनच्या खाली दबलेल्या दोघांना ट्रक बाहेर काढन्यात आले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. या अपघातामुळे महामागार्ची वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी ३ तास प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.