काटेपूर्णा नदीपात्रात ट्रक कोसळला; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:47 IST2020-12-18T09:43:55+5:302020-12-18T10:47:18+5:30
Accident News राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अपघात झाला.

काटेपूर्णा नदीपात्रात ट्रक कोसळला; एक ठार, एक जखमी
ठळक मुद्देसाहेब खा युसुफ खा असे या अपघातातील मृतकाचे नाव आहे.क्लीनर औरंगजेब खा हलील खा हा अडकुन होता.
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपुर्णा नदीच्या पात्रात ट्रक शंभर फूट खोल पडुन एकाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 18 डिसेंबर शुक्रवारी सकाळी 5 वाजता दरम्यान घडली, साहेब खा युसुफ खा असे या अपघातातील मृतकाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुर्तीजापुर कडून अकोला कडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.48 ए .जी.1465 मालवाहू ट्रक कोळसा वाहुन नेत असताना काटेपुर्णा नदीचे पात्र पुलावरून पार करताना महामार्गावरील खड्डे चुकवत असताना धुके असल्याने सदर वाहन चालकांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक काटेपुर्णा नदीच्या पात्रात शंभर फूट खोल पडुन अपघात झाला. या अपघातातील ट्रकचा चुराडा झाला. दरम्यान चालक साहेब खा युसुफ खा राहणार पालघर मुंबई ह्याचां घटना स्थळावर ट्रक मध्ये अडकुन मृत्यू झाला,तर क्लीनर औरंगजेब खा हलील खा हा अडकुन होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे योगेश काटकर धनसिंग राठोड, यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर अडकुन पडलेल्या क्लीनर औरंगजेब यास काटेपुर्णा येथील आपत कालीन पथकाच्या मदतीने बाहेर काढून अकोला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह बिटजमादार दिपक कानडे योगेश काटकर हे करीत आहेत,