भरधाव ट्रक पुलावरून भिकूंड नदीत कोसळला, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 18:39 IST2020-12-07T18:37:18+5:302020-12-07T18:39:45+5:30
Accident on highway ट्रक नदीत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

भरधाव ट्रक पुलावरून भिकूंड नदीत कोसळला, दोन ठार
ठळक मुद्देअपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती आहे.एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
बाळापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरून भरधाव वेगात जात असलेला ट्रक बाळापूरनजीकच्या भिकुंड नदी पात्रात कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाळापूर बायपासजवळील भिकुंड नदीच्या पुलावरून ट्रक नदीत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात अपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती आहे. त्यापैकी एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकाचा मृतदेह अद्यापही ट्रकखाली दबलेला आहे. हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.