ट्रकवर आदळली कार दोघे जागीच ठार

By admin | Published: July 31, 2015 01:58 AM2015-07-31T01:58:20+5:302015-07-31T01:58:20+5:30

माना शिवारातील घटना: एक गंभीर

The truck hit the car and killed both on the spot | ट्रकवर आदळली कार दोघे जागीच ठार

ट्रकवर आदळली कार दोघे जागीच ठार

Next

मूर्तिजापूर/जामठी बु. (जि. अकोला): अकोल्याकडून अमरावतीकडे भरधाव जाणारी हय़ुंडाई आयटेन कार २९ जुलैच्या रात्री १२.३0 ते १ वाजताच्या सुमारास माना गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातातील जखमीला अकोल्यास हलविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर माना गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर २९ जुलै रोजी दोन ट्रकचा अपघात झाला होता. तेथे उभ्या असलेल्या एम.एच.४0-५९९३ क्रमांकाच्या ट्रकवर अकोल्याकडून अमरावतीकडे भरधाव जाणारी एम.एच.३0 पी.३२३0 क्रमांकाची हय़ुंडाई आयटेन कार २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर जाऊन आदळली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे अकोल्यातील आकोट फैलमधील रहिवासी व अकोला तालुक्यातील शिलोडाचे उपसरपंच नासीरखाँ जोरावरखाँ (३0), अकोल्यातील रामदासपेठ भागातील रहिवासी शशांक विनायक कांगटे (२५) हे दोघे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत कारमधून प्रवास करणारे शिलोडाचे सरपंच व शासकीय कंत्राटदार दिलीप पाटील सरोदे (३0) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात अपघातग्रस्त हुय़ंडाई आयटेन कारच्या दर्शनी भागाचा पार चेंदामेंदा झाला. अपघातातील जखमीला तातडीने अकोल्यास हलविण्यात आले. या अपघातातील दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ३0 जुलै रोजी दुपारी करण्यात आले. त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. अपघातस्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला.

Web Title: The truck hit the car and killed both on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.