महामार्गावर ट्रक उलटला; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 13:36 IST2019-05-04T13:36:13+5:302019-05-04T13:36:19+5:30
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी बस थांब्या नजीक लोखंडी खांब वाहुन नेणारा कन्टेनर ट्रक पुलावरून खाली पलटी झाला.

महामार्गावर ट्रक उलटला; दोन जखमी
लोकमत न्युज नेटवर्क
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी बस थांब्या नजीक लोखंडी खांब वाहुन नेणारा कन्टेनर ट्रक पुलावरून खाली पलटी झाला. या दुर्घटनेत चालका सह क्लिनर जखमी झाले. सुदैवाने प्राणहानी टळली ही घटना शनिवारी 4 मार्च सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार मूर्तीजापूर कडून अकोला कडे लोखंडी खांब वाहुन नेणारा कन्टेनर ट्रक क्रमांक सि.जी.04 , एच.झेड , 5321 जात असताना वणीरंभापुर बस थांब्या नजीक महामार्गावरील पुलावरून खाली उलटला. या अपघातात ट्रक च्या कॅबीन चा चुराडा झाला. तर लोखंडी खांब अस्ताव्यस्त झाले. सदर वाहन चालक व क्लिनर जखमी झाले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील दिवसा आड अपघाताची मालिका लक्षात घेऊन संबंधीत विभागाने रखडलेले चौपदरीकरणाचे काम त्वरित निर्णय घेऊन सुरुवात करावे, अशी सर्व सामान्य नागरिकांसह वाहनचालकांकडून बोलल्या जात आहे.