अॅसीड वाहुन नेणारा ट्रक उलटला : चालक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:47 PM2019-03-19T18:47:01+5:302019-03-19T18:47:49+5:30
बोरगाव मंजू (अकोला): अॅसीडची वाहून नेणारा ट्रक उलटल्याने चालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना १९ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी नजीक घडली.
बोरगाव मंजू (अकोला): अॅसीडची वाहून नेणारा ट्रक उलटल्याने चालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना १९ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी नजीक घडली. देवेंद्र बबलू रजत रा.मध्यप्रदेश असे मृतक चालकाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकमधील अॅसीड चालकाच्या अंगावर पडल्याने तो भाजल्या गेला.
बोरगाव मंजू कडुन नागपूरकडे मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ०४ एचडी ४१११ हा अॅसिडचे डब्बे वाहुन नेत होता. राष्ट्रीय महामार्गावर दाळंबी जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाउन उलटला. या अपघातात कॅबीनमध्येच अडकून चालक देवेंद्र बबलू रजत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर क्लिीनर बलराम कुसाराम हा गंभीर जखमी झाला.या अपघातानंतर ट्रकमधील अॅसीड चालकाच्या अंगावर पडल्याने तो पूणपणे भाजल्या गेला होता. घटनेची माहीती बोरगाव मंजु पोलिसांना मिळताच घटनास्थळावर ठाणेकर संजीव राऊत सह पोलीसांनी सदर अडकून पडलेल्या वाहन चालकास मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालय अकोला येथे उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले. दरम्यान संत गाडगे बाबा आपत्कालीन पथक,कोळंबी, कुरणखेड येथील ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांना सहकार्य केले. या घटनेचा पंचनामा करून बोरगावमंजू पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार संजीव राउत पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)