जीवनाची जडणघडण करणारा शिक्षक खरा मार्गदर्शक- पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:54+5:302021-09-07T04:23:54+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम व कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण ...

A true guide who makes life difficult - Patil | जीवनाची जडणघडण करणारा शिक्षक खरा मार्गदर्शक- पाटील

जीवनाची जडणघडण करणारा शिक्षक खरा मार्गदर्शक- पाटील

Next

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम व कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती लरातो वाणिज्य महाविद्यालय सभागृहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, डॉ.अपर्णाताई पाटील, प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, प्राचार्य डॉ. विजय नानोटी, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, राज्य महिला आघाडी प्रमुख वंदना बोर्डे, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, शिक्षक सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रा. नरेंद्र लखाडे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी केले. संचालन नितीन बंडावार व अमित सुरपाटने यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन काठोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन,दत्तात्रय सोनोने, रुजिता खेतकर, श्याम कुलट, संतोष वाघमारे, अजय पाटील, देवेंद्र वाकचवरे,सुनील माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरुण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोषराव इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग.सु.ठाकरे,समाधान उमप आदींनी परिश्रम घेतले.

फोटो:

या शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. जितेंद्र काठोळे, राजेश पातळे, श्रीकृष्ण गावंडे, तुलसीदास खिरोडकर,जव्वाद हुसैन व संघदास वानखडे, कीर्ती चोपडे या शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: A true guide who makes life difficult - Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.