तुरीचे पीक धोक्यात; शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:01+5:302020-12-15T04:35:01+5:30
तेल्हारा शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था तेल्हारा : शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...
तेल्हारा शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था
तेल्हारा : शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकास वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
-----------------------------
बाळापूर शहरात वाढले अतिक्रमण
बाळापूर : शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटत असल्याने शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अतिक्रमण वाढल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना नाहक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
---------------------
कान्हेरी-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
बाळापूर : कान्हेरी-वाडेगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गाने माणकी, देगाव, टाकळी खुरेशी, वाडेगाव येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू राहते. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------
पारस येथे व्हॉल्व्ह लिकेज; रस्त्यावर गटार
पारस : येथील वाॅर्ड क्रमांक चारमधील एकूण तीन व्हॉल्व्ह लिकेज असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी रस्त्याने वाहत असल्याने रस्त्यावर गटाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रस्त्यावर पाणी साचत असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.(फोटो)