‘विश्‍वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:48 AM2017-09-07T00:48:29+5:302017-09-07T00:48:39+5:30

The 'Trust Trophy' Ballet Contest From today | ‘विश्‍वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा आजपासून

‘विश्‍वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा आजपासून

googlenewsNext
ठळक मुद्देजेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब यांच्यावतीने स्पधेर्चे आयोजन स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग नोंदवला आहे


अकोला : जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब यांच्यावतीने ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान विश्‍वास करंडक बालनाट्य स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरूवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी यांच्या हस्ते स्पधेर्चे उद्घाटन होणार असून, आयोजन समिती प्रमुख प्रा. मधू जाधव यांची उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. ७ सप्टेंबर पासून सुरू होणार्‍या स्पर्धेत रोज १0 ते ११ शाळांचे सादरीकरण होईल. 
या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणार्‍या पहिल्या नाटकाला १0 हजार रुपये रोख आणि करंडक देण्यात येणार आहे. तर ७ हजार रुपये रोख द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख पारितोषिक राहणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये देण्यात येतील. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट पार्श्‍व संगीत, उत्कृष्ट नेपथ्य या प्रत्येक गटासाठी प्रथम १000, द्वितीय ७00 व तृतीय ५00 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. यासोबतच ३ हजार रुपये रोख ज्युरी स्पेशल अवॉर्ड आणि ३ हजार रुपये र्जनालिस्ट स्पेशल अवॉर्ड देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी प्रत्येक कलाकाराला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक सहभागी शाळेला २000 रुपयांची पुस्तके आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे.
 या स्पर्धेसाठी आयोजक समितीचे प्रमुख प्रा. मधू जाधव, प्रशांत गावंडे, डॉ. सुनिल गजरे, अशोक ढेरे, अमोल सावंत, आशिष राठी, ललित राठी, अविनाश पाटील, अनिल कुळकर्णी, प्रदीप खाडे यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: The 'Trust Trophy' Ballet Contest From today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.