विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:36 AM2017-09-15T01:36:21+5:302017-09-15T01:36:28+5:30

विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. 

Try to create a doctor's attitude in students - Jadhav | विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत - जाधव

विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत - जाधव

Next
ठळक मुद्देविभागीय विज्ञान मेळावा मानसी राऊत, वैष्णवी गरड, श्रेया कंबोई चमकल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान ग्रहण करतात. त्या ज्ञानाची सांगड निसर्गातील घटनांशी घालून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव यांनी येथे केले. 
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बालशिवाजी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात गुरुवारी उद्घाटन करताना ते बोलत होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अविनाश देव होते. अमरावतीचे विभागीय शास्त्र सल्लागार मुकुंद घडेकर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय अध्यक्ष प्रा. रवींद्र भास्कर, बालशिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थित होती. 
अविनाश देव यांनी मार्गदर्शन करताना उत्तम विद्यार्थीच उत्तम शिक्षक बनू शकतो. शिक्षकानेसुद्धा विद्यार्थी बनूनच विविध ज्ञान ग्रहण करावे, तरच त्याच्या विद्यार्थ्यांची प्रगती होते, असे सांगितले. विभागीय मेळाव्यामध्ये बालशिवाजी शाळेची मानसी अरुण राऊत हिने प्रथम क्रमांक पटकावला. मोहनाबाई कन्या शाळा दिग्रस (यवतमाळ) येथील वैष्णवी सुभाष गरड, एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिमची श्रेया जयप्रकाश कंबोई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे होते. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अर्चना सावरकर, प्रा. डॉ. पूनम अग्रवाल, प्रा. डॉ. सावरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र भास्कर यांनी केले. संचालन संगीता जळमकर यांनी केले. आभार अरुण शेगोकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष जाधव, अनिल जोशी, सुरेश किरतकर, विश्‍वास जढाळ, विनोद देवके, देवानंद मुसळे, सुनील वावगे, सुनील निखाडे, मनोज तायडे, माया देहानकर, सुरेखा माकोटे, विजय पजई, पी.एम. संगमवार आदींनी प्रयत्न केले. 

Web Title: Try to create a doctor's attitude in students - Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.