जीवनात समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करा!
By admin | Published: May 6, 2017 01:39 PM2017-05-06T13:39:28+5:302017-05-06T13:39:28+5:30
जीवनात समस्येचा भाग न बनता, समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी केले.
जी. श्रीकांत यांचे प्रतिपादन : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
अकोला: जीवनात समस्येचा भाग न बनता, समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध वर्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान राज्य प्रकल्प सहसंचालक (मुंबई ) शरद पाटील, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. नरेशचंद्र काठोळे (अमरावती ), प्रा. यादव वक्ते, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात केवळ स्वत: मोठे बनणे महत्त्वाचे नसून, आपल्यामुळे लोकं किती मोठे होतात, यासंबंधीचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असेही जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात शरद पाटील लिखित ह्यताओ गाथाह्ण या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नचिकेत बडगुजर व स्मृती धूत यांनी तर आभार प्रदर्शन शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले.