गांधी रोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 08:05 PM2017-11-14T20:05:15+5:302017-11-14T20:07:22+5:30
गांधी रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरटयांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेर्यात कैद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गांधी रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरटयांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेर्यात कैद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शहरातील मध्यभागात असलेल्या गांधी रोडवरील चांदेकर चौकामध्ये कॅनरा बँकेचे एटीएम आहे. मुख्य बाजारपेठ असल्याने या परिसरात रात्री उशिरापयर्ंतमोठी वर्दळ असल्याने या परिसरात पोलिसांची नेहमीच गस्त असते. असे असतांनाही हे एटीएम चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एटीएममध्ये
लावलेल्या सीसी कॅमेर्यात कैद झाला. बँकेत या सीसी कॅमेर्याची तपासणी केली असता हा चोरीचा प्रयत्न दिसून आला. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापक कार्तिका तुलाराम गजभिये (४५) यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्न उपस्थित होत आहे.