वाळूमाफियांकडून पोलीस अधिका-यास चिरडण्याचा प्रयत्न!

By admin | Published: September 2, 2016 01:17 AM2016-09-02T01:17:36+5:302016-09-02T01:17:36+5:30

पाठलाग करून पडकला वाळूचा ट्रक; कारंजा महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई.

Trying to crush the police officer from the sand mafia! | वाळूमाफियांकडून पोलीस अधिका-यास चिरडण्याचा प्रयत्न!

वाळूमाफियांकडून पोलीस अधिका-यास चिरडण्याचा प्रयत्न!

Next

कारंजा लाड (जि. वाशिम), दि. १ : बेकायदा पद्धतीने वाळू घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाने पोलिसांनी नाकाबंदीसाठी लावलेल्या ह्यबॅरिकेड्सह्णला धडक मारून सहायक पोलीस उपनिरीक्षकास चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यात ते बचावले. यादरम्यान, ३५ किलोमीटर अंतरापयर्ंत सिनेस्टाइल पाठलाग करून पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी मंगरूळपीर तालुक्यातील पोटी फाट्याजवळ ट्रकचालकास जेरबंद केले.
येथील उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. शरद जावळे हे गुरुवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास शासकीय वाहनाने कारंजाहून मानोराकडे जात असताना त्यांना इंझोरी ते कुपटा यादरम्यान विरुद्ध दिशेने अवैध वाळू भरलेला ट्रक (क्रमांक एमएच २८ बी-८७८८ ) जाताना दिसला. त्यांनी त्यास हात दाखवून ट्रक थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने भरधाव ट्रक पळविला. त्यांनतर पथकाने ट्रकचा पाठलाग सुरू केला. बायपासवर ह्यबॅरिकेड्सह्ण लावून नाकाबंदी केली; परंतु ट्रकने ह्यबॅरिकेड्सह्णला कट मारून मंगरूळपीरच्या दिशेने पळ काढला. शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक राम सुरवसे यांनी या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते यातून बचावले. दरम्यान, ट्रक मंगरूळपीरच्या दिशेने भरधाव पळविला. परंतु पोलिसांनी या ट्रकला कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील पोटी फाट्याजवळ शिताफीने पकडले. या ट्रकमध्ये चालकासह एकूण तीन ते चार व्यक्ती होते. मात्र, त्यातील दोघे पसार झाले. चालकासह वाळूचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईसाठी कारंजा ग्रामीण पोलिसांकडे सुपुर्द केला आहे. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Trying to crush the police officer from the sand mafia!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.