तुकारामजी भेले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:01+5:302021-03-18T04:18:01+5:30

---------------------------------------- वाडेगाव येथे गर्दीवर नियंत्रण वाडेगाव : काही दिवसांपूर्वी येथील आठवडी बाजारात कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करून ठिकठिकाणी ...

Tukaramji Bhele passed away | तुकारामजी भेले यांचे निधन

तुकारामजी भेले यांचे निधन

Next

----------------------------------------

वाडेगाव येथे गर्दीवर नियंत्रण

वाडेगाव : काही दिवसांपूर्वी येथील आठवडी बाजारात कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करून ठिकठिकाणी गर्दी होत होती. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने गर्दीवर बहुतांश नियंत्रण मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

-----------------------

घुसर येथे पाणीटंचाई

म्हातोडी : येथून जवळच असलेल्या घुसर येथे गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे विशेषत: महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे.

------------------------------------

दर वाढूनही सोयाबीन आवक घटली

पातूर : जिल्ह्यात सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण असले तरी कोरोना संसर्गामुळे सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

---------------------------------

भरारी पथकाची चोरट्यांना दहशत

बाळापूर : मालेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून वीजचोरी करणाऱ्यांवर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वीज चोरटे दहशतीत असून, भरारी पथकाची चांगलीच भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

------------------------------------

चोहोट्टा येथून होतेय अवैध वाहतूक

चोहोट्टा : अकोट तालुक्यातील आडसूळमार्गे खासगी वाहनचालकांकडून अवैध वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून हा प्रकार सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

-----------------------------------------

आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण

हातरून : येथील आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांना दिली जात आहे. या लसीकरणाला प्रतिसाद लाभत असून, सोमवारपर्यंत परिसरातील ५० च्यावर नागरिकांनी ही लस टोचून घेतली.

--------------------------------------

महाडीबीटी पोर्टलवर अर्जांचे आवाहन

तेल्हारा : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने मंगळवारी केले.

-----------------------------------------

मूर्तिजापूर येथील व्यापाऱ्यांची चाचणी

मूर्तिजापूर : येथील बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांनी कोविड चाचणी केली नसेल त्यांनी कोरोनाची चाचणी त्वरित करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत होत आहे.

Web Title: Tukaramji Bhele passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.