तुरीला मिळणार ८ हजार प्रतिक्विंटल भाव!

By Admin | Published: December 5, 2015 09:08 AM2015-12-05T09:08:20+5:302015-12-05T09:08:20+5:30

कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी व केंद्रीय विपणन केंद्राचा अंदाज.

Tula will get 8 thousand quintillion rupees! | तुरीला मिळणार ८ हजार प्रतिक्विंटल भाव!

तुरीला मिळणार ८ हजार प्रतिक्विंटल भाव!

googlenewsNext

अकोला : राज्यात तूर कडधान्य पिकाला डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५00 ते ८000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे. भारतात तुरीचे क्षेत्र दोन दशकात ३.५ ते ४ लाख हेक्टर असून, उत्पादन जवळपास २.५ ते ३ लाख टन आहे. भारतीय कृषी संचालनालयानुसार २0१४-१५ मध्ये २.७८ लाख टन होते. इतर कडधान्य पिकाप्रमाणे तूर कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. तुरीखालील ९६ टक्के क्षेत्र हे असिंचित आहे. तुरीखालील क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर आहे. २0१३-१४ मध्ये हे क्षेत्र १.१४ लाख हेक्टर होते. उत्पादन १.0३ लाख टन झाले होते. महाराष्ट्रात लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर ही महाराष्ट्रातील तुरीची प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. तुरीचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न डॉ.पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग व अकोला येथील एनएआयपी कृषी विपणन माहिती केंद्राच्या संशोधन चमूने लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथ्थकरण केले. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारात चालू स्थिती कायम राहिल्यास, समतोल हवामानात तुरीला चालू महिन्यात सरासरीच्या किमती जवळपास ७,५00 ते ८000 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात धोरणात झालेले बदल तसेच सद्यस्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम तुरीच्या किमतीवर होऊ शकतो.

Web Title: Tula will get 8 thousand quintillion rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.