तूर ५१ हजार हेक्टरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:10+5:302021-05-29T04:16:10+5:30
अकोला : कृषी विभागाने यंदा खरीप हंगामात पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड ...
अकोला : कृषी विभागाने यंदा खरीप हंगामात पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड होणार आहे. आंतरपीक म्हणून तुरीची लागवड वाढणार आहे. वेधशाळेनेही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
शीतपेयांची दुकाने बंदच
अकोला : उन्हाळ्यात शीतपेयांची दुकाने शहरात ठिकठिकाणी लावून अनेक जण व्यवसाय करतात. मात्र, कोरोना संकटामुळे शीतपेयांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे रोजगारही बुडाला आहे.
बागायत शेतीचे पूर्वनियोजन
अकोला : जिल्ह्यात बागायत शेतीचे क्षेत्रफळ दररोज वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची समस्या उभी राहिल्याने, उन्हाळी हंगामात बागायतदारांना नुकसान सहन करावे लागले. ही मरगळ झटकून पुन्हा पावसाळी बागायतीचे पूर्वनियोजन सुरू झालेले आहे.
फुलशेतीचे नुकसान
अकोला : अडीच महिन्यापासून निर्बंधांमुळे शहरात फुलविक्री बंद आहे. मागणी नसल्याने फुले विकत घेण्यास कोणता विक्रेता तयार नाही. परिणामी, फुलशेतीचे नुकसान होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात फुले सडत आहेत.