तूर, हरभरा खरेदीचे चुकारे थकलेलेच; अकोला -वाशिम जिल्ह्यात ३८११ शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:25 PM2018-08-14T12:25:02+5:302018-08-14T12:27:52+5:30
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर व हरभरा विकलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही थकलेलेच आहेत.
- संतोष येलकर
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर व हरभरा विकलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही थकलेलेच आहेत. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात ३ हजार ८११ तूर व हरभरा उत्पादक शेतकरी चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. ‘नाफेड’मार्फत गत १५ मे पासून तूर खरेदी तर २९ मे पासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर -हरभरा विकलेल्या शेतकºयांपैकी दहा टक्के शेतकºयांचे चुकारे अद्यापही थकीत आहेत. अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत ३ हजार ८११ तूर व हरभरा उत्पादक शेतकºयांना विकलेल्या तूर हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात ५७५ तूर उत्पादक शेतकºयांचे ५ कोटी ४६ लाख ८८ हजार ३८५ रुपयांचे आणि ३२६ हरभरा उत्पादक शेतकºयांचे २ कोटी ११ लाख ५७ हजार ३६५ रुपयांचे तर वाशिम जिल्ह्यात ४४८ तूर उत्पादक शेतकºयांचे ४ कोटी ८ लाख ६५ हजार ४६३ रुपयांचे व हरभरा उत्पादक २ हजार ४६२ शेतकºयांचे १९ कोटी ३१ लाख ४९ हजार ९६८ रुपयांचे चुकारे थकले आहेत. अशीच परिस्थिती इतरही जिल्ह्यात आहे. तूर व हरभरा खरेदीचे चुकारे थकल्याने हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.