सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन बंद करा!

By admin | Published: November 6, 2014 01:09 AM2014-11-06T01:09:36+5:302014-11-06T01:09:36+5:30

अकोला मनपा आयुक्तांचे वीज कंपनीला आदेश.

Turn off power connection of the submersible pumps! | सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन बंद करा!

सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन बंद करा!

Next

आशिष गावंडे / अकोला
पाण्यासाठी दारोदारी वणवण भटकणार्‍या गोरगरीब नागरिकांना सबर्मसिबल पंप, हातपंपामुळे दिलासा मिळाला. मनपा प्रशासनाला मात्र यासंदर्भात काहीही घेणे-देणे नसल्यामुळे काटकसर करण्याच्या उद्देशातून शहरातील संपूर्ण सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी वीज वितरण कंपनीला दिले. आयुक्तांच्या निर्णयामुळे नगरसेवकांसह अकोलेकरांच्या पायाखालची वाळू सरकली असून, प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत अकोला मनपाचा आस्थापना खर्च ६४ टक्क्यांच्या वर आहे. आस्थापना खर्चात अवाढव्य वाढ असल्यामुळे मागील बारा वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील पात्र ४२ लाभार्थी सेवेत सामावून घेण्यासाठी ह्यवेटिंगह्णवर आहेत. तरीसुद्धा प्रशासन कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन देत आहे. अर्थातच, एकीकडे कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित केल्यास त्यांच्या वेतनाचा भार मनपाला उचलणे शक्य नसल्याची स्थिती असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनाने काटकसरीचे अजब गजब धोरण स्वीकारले आहे.
गोरगरीब नागरिकांच्या सुविधेसाठी प्रभागात उपलब्ध असलेले सबर्मसिबल पंप, जेटपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश आयुक्त डॉ.कल्याणकर यांच्यासह उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी वीज कंपनीला ऑगस्ट महिन्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आजरोजी शहराच्या विविध भागात सुमारे ६00 सबर्मसिबल पंप आहेत. यातील २00 सबर्मसिबल पंपांचे केवळ चार लाखाचे देयक मनपाला अदा करावे लागते. अवघ्या चार लाखांच्या काटकसरीसाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून, यानंतरही सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन कायम असल्यास त्याचे देयक मनपा अदा करणार नसल्याचे कंपनीला ठासून सांगण्यात आले.

Web Title: Turn off power connection of the submersible pumps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.