लसीकरण टोकन पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:20+5:302021-05-14T04:18:20+5:30

.................. अशोका फाउंडेशनने लावले पक्ष्यांसाठी जलपात्र अकोला : अशोका फाउंडेशन यांनी पशू-पक्ष्यांसाठी ‘पशू-पक्षीसंवर्धन’ हा उपक्रम हाती घेऊन स्वखर्चाने ७० ...

Turn off the vaccination token method | लसीकरण टोकन पद्धत बंद करा

लसीकरण टोकन पद्धत बंद करा

Next

..................

अशोका फाउंडेशनने लावले पक्ष्यांसाठी जलपात्र

अकोला : अशोका फाउंडेशन यांनी पशू-पक्ष्यांसाठी ‘पशू-पक्षीसंवर्धन’ हा उपक्रम हाती घेऊन स्वखर्चाने ७० ते ८० ठिकाणी जलपात्र आणि अन्नाची सोय केली. नागरिकांनीही कडक उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या पाखरांची तहान मिटवावी, असे आवाहन अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी केले आहे.

..................

काेराेना नियमांचे पालन करा

अकोला : महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्‍टन्सिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, चेहऱ्यावर मास्‍क लावावा आणि सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ ठेवावेत. त्याचप्रमाणे प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिलेल्‍या सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोनाला आळा घालण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले आहे.

.........................

कुंभार समाजाला सवलत द्या

अकोला : लाॅकडाऊनचा सर्वांत जास्त फटका कुंभार समाजाला बसला आहे. गेल्या वर्षी गणपतीच्या मूर्तींची उंची कमी केल्याने अनेक मूर्ती विकल्या गेल्या नाहीत. आता अक्षय तृतीयेला मातीच्या घागरी विकण्यासाठी लाॅकडाऊनचा अडथळा आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाचे महत्त्व लक्षात घेता कुंभार समाजाला तासाची सवलत देण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.

...................................

Web Title: Turn off the vaccination token method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.