प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळविण्याचं मोठं आव्हान असेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:19+5:302021-09-27T04:20:19+5:30

शासनाच्या या निर्णयामुळे कलावंतांना जगण्याला आधार मिळेल. त्यामुळे कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कलावंत हा समाजाचा कणा आहे. समाजातील विविध ...

Turning the audience to the theater will be a big challenge ... | प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळविण्याचं मोठं आव्हान असेल...

प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळविण्याचं मोठं आव्हान असेल...

Next

शासनाच्या या निर्णयामुळे कलावंतांना जगण्याला आधार मिळेल. त्यामुळे कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कलावंत हा समाजाचा कणा आहे. समाजातील विविध विषय, समस्या कलावंत मांडत असतो. अजूनही कोविडच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे नियमांचे पालनही आवश्यक आहेच. मात्र, कलावंतांची स्थिती पाहता शासनाने नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करावीत. सरकार हे कलावंतांसाठी करेल, अशी आम्हाला आशा आहे. नाट्यगृह सुरू होणार असले, तरी अकोल्यातील सांस्कृतिक भवन अद्याप मिळाले नाही. कलावंत उपाशी मरतोय. अकोल्यातील हक्काचं सांस्कृतिक भवन सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घातले. पण, सांस्कृतिक भवन हे दारूचा अड्डा झाला आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. काेरोना काळात हौशी कलावंतांची स्थिती वाईट झाली आहे. हौशी कलावंतच हौशी कलावंतांना मदत करत आहेत. समाजाने त्यांना जगवायला हवे, असेही आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

वन रुपी दायित्व फाऊंडेशन

कोरोना काळात इतर कलावंतांप्रमाणेच वृद्ध कलावंतांची अत्यंत वाईट स्थिती झाली आहे. अशा कलावंतांसाठी वन रुपी दायित्व फाऊंडेशन सुरू करण्यात आले आहे. दानदात्यांकडून दर दिवशी एक रुपया, असे महिन्याचे ३० रुपये मदत म्हणून गोळा केली जाते. या पैशातून वृद्ध कलावंतांना दर महिन्याला किराणा किट पोहोचविले जात आहे.

- रमेश थोरात, संस्थापक अध्यक्ष, नटश्रेष्ट निळू फुले आर्ट फाऊंडेशन, अकोला

Web Title: Turning the audience to the theater will be a big challenge ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.