तुषार पुंडकर हत्याकांड : ‘रेकी’ करीत मारेक ऱ्यांनी डाव साधला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:09 AM2020-02-25T11:09:45+5:302020-02-25T11:09:56+5:30

पोलीस यंत्रणासुद्धा तपासात चक्रावून गेली असल्याने ठोस माहिती अद्यापही पुढे आली नसल्याचे दिसत आहे.

Tushar Pundkar massacre: Killers do 'Reiki' for murder | तुषार पुंडकर हत्याकांड : ‘रेकी’ करीत मारेक ऱ्यांनी डाव साधला!

तुषार पुंडकर हत्याकांड : ‘रेकी’ करीत मारेक ऱ्यांनी डाव साधला!

googlenewsNext

- विजय शिंदे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची मारेकऱ्यांनी रेकी करीत हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यामुळे तुषारच्या हत्याकांडाची एखादी कडी अकोटात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व घटनाक्रम पाहता पोलीस यंत्रणासुद्धा तपासात चक्रावून गेली असल्याने ठोस माहिती अद्यापही पुढे आली नसल्याचे दिसत आहे.
अकोट शहरातील पुंडकर दूध डेअरी व पोलीस वसाहत या दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी रात्री दुचाकीवर आलेल्या शुटरने देशी कट्ट्याने गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे मारेकरी शॉर्प शुटर असल्याचे बोलल्या जात आहे. तरी मात्र तुषार नेमका कुठे बसलेला आहे आणि त्याच्यावर हल्ला केल्यानंतर तो कुठे पळून जाऊ शकतो, याची रेकी मारेकºयांनी केली असल्याचे निवडलेल्या घटनास्थळावरून दिसून येत आहे. मारेकºयांनी पुंडकरची दूध डेअरी असतानाही पोलीस स्टेशननजीक जोखिमीचे ठिकाण का निवडले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या ठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेत अचूकपणे तुषार यांच्यावर हल्ला चढवल्याने तुषार पोलीस वसाहतीत पळाल्यास त्या ठिकाणी हल्ला करून पसार कसे होता येईल, याची माहिती बहुधा मारेकºयांना असावी किंवा दिली असावी. त्यामुळे पोलीस वसाहतीत त्याच्यावर दोन गोळ्या झाडून समोरील रस्त्याने दुचाकीवरून सहजरीत्या पळून गेले.
सुपारी देऊन हत्या केल्याचा संशय
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्या पद्धतीने तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार केला त्यावरून ते सराईत गुन्हेगार असल्याचे दिसते. त्यामुळे पुंडकर यांची हत्या सुपारी देऊन केल्याची शक्यता नाकारता येत नाही. मारेकºयांनी घटनास्थळावर कुठलाही पुरावा ठेवला नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. पोलीस अधिकाºयांनी तुषार पुंडकर यांच्याशी खटके उडालेल्या व गंभीर घटनेत तुषार विरुद्ध फिर्याद व जुन्या घटनेशी संबंधित असणाºयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून सखोल चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून एखादी कडी हाती लागते का, याचा तपास केला जात आहे. तुषारचे मित्र व पक्षसंघटनेतील संबंधित यांच्याकडूनही बारीकसारीक माहिती घेतली जात आहे.

 

Web Title: Tushar Pundkar massacre: Killers do 'Reiki' for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.