तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांना ओळखणारा गवसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 01:02 PM2020-02-29T13:02:37+5:302020-02-29T13:03:08+5:30

दुचाकीवर एक सडपातळ व जाड बांधा असलेला असे दोन इसमांना पळताना एका पोलीस कर्मचाºयाने प्रत्यक्ष पाहिले.

Tushar Pundkar massacre: man find who recognizing attackers! | तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांना ओळखणारा गवसला!

तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांना ओळखणारा गवसला!

googlenewsNext

- विजय शिंदे
अकोट: प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर बेछूट गोळीबार करून पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना ओझरते ओळखणारा प्राथमिक साक्षीदार पोलिसांना गवसला असल्याचे समजते. त्यामुळे हल्लेखोराचे वर्णनात्मक व्यक्तिचित्र व इतर बाजू जाणून घेण्याकरिता प्राथमिक साक्षीदाराला घेऊन पोलिसांचे एक पथक अकोटवरून पुणे येथे दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे. आठवडा उलटूनही या हत्याकांडाचा उलगडा झाला नाही.
स्थानिक पोलीस वसाहतीत पुंडकर यांची २१ फेब्रुवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून दुचाकीवर एक सडपातळ व जाड बांधा असलेला असे दोन इसमांना पळताना एका पोलीस कर्मचाºयाने प्रत्यक्ष पाहिले. ज्या ज्या रस्त्यावर हे हल्लेखोर निघाले त्याला तपासून शहरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक लोकांशी संवाद साधून २१ फेब्रुवारीला रात्रीच्या वेळी कोणी संशयास्पद अशा दोन इसमांना पडताना पाहिले काय, याची माहिती घेतली. या माहिती संकलनामध्ये घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका बँकेजवळ दुचाकीचा पावरफुल लाइट लावून दोन इसम पळून जाताना एक -दोन जणांनी पाहिले. शिवाय दुचाकी घेऊन पळून जाणाºयांचा मोबाइलसुद्धा खाली पडला आणि मोबाइल उचलण्यासाठी त्यांनी संवाद केल्याचे ऐकले, अशीही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. या माहितीच्या आधारावर तपास करणाºया पोलीस अधिकाºयांनी खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न केला. या प्राथमिक माहितीगार सूत्राने दुचाकीस्वारांना पळून जाताना ओझरते पाहिले असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पळून गेलेल्या इसमाचे परफेक्ट वर्णन जाणून घेण्याकरिता उच्चस्तरीय फॉरेन्सिक लॅबमध्ये एक पोलीस पथक माहितीगार सूत्राला घेऊन गेल्याचे समजते. या फॉरेन्सिक लँबमधील संशयीत हल्लेखोरांच्या वर्णनाची पोलिसांना प्रतीक्षा असून, अजूनपर्यंत गावठी पिस्टल, काडतुस व इतर घटनास्थळावरील तपासणीचे अहवाल आले किंवा नाही? यांची माहिती पोलिसांनी जाहीरपणे स्पष्ट केली नाही.

 

Web Title: Tushar Pundkar massacre: man find who recognizing attackers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.