४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये किलबिलाट ,पण पालकांची संमती आवश्यक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:46+5:302021-09-25T04:18:46+5:30
कोरोना नियमात सध्या ३५६ शाळा सुरू जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ३७१ शाळांपैकी ३५६ शाळा सुरू झाल्या आहेत; ...
कोरोना नियमात सध्या ३५६ शाळा सुरू
जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ३७१ शाळांपैकी ३५६ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. प्राथमिकच्या शाळा सुरू करण्यात आल्या; परंतु विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी शासनाने अद्याप दिलेली नाही.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत; परंतु शाळा, वर्गांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने मेंटेनन्स अनुदान दिले असून, त्यातून हा खर्च भागविण्यास सांगितले आहे. याबाबत एसओपीमध्ये काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे.
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली- २९५०८
दुसरी- २९३४९
तिसरी- २९४६४
चौथी- २९८१२
पाचवी- २९७२९
सहावी- २९४३८
सातवी- २९३४०
आठवी- २८५९५
नववी- २८७५०
दहावी- ३०१७८
अकरावी- २५८३३
बारावी- २२८८९
उपस्थितीची सक्ती नाही!
पुढील महिन्यात शाळा सुरू होणार असल्यातरी विद्यार्थ्यांना उपस्थितीची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडे सर्व अधिकार असणार आहे.
शिक्षकांचे झालेले लसीकरण (१७ सप्टेंबरपर्यंत)
पहिला डोस- ६,८१४
दुसरा डोस- ५,५५७
दोन्ही डोस न घेतलेले- २,४१९
शाळा सुरू करण्याबाबत आदेश आणी एसओपी आल्यानंतर त्यानुसार नियाेजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आराेग्य हा प्राधान्यक्रम असणार आहे त्यासाठी केलेल्या सूचनांची अमंजबजावणी काटेकाेर केली जाईल.
डाॅ. सुचित पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक