लाचखोरीची अडीच पटीने झेप!

By admin | Published: December 4, 2014 11:57 PM2014-12-04T23:57:15+5:302014-12-04T23:57:15+5:30

नोव्हेंबर महिन्यातील कारवाई : १११ सापळे यशस्वी

Twenty-two-and-a-half-time jump! | लाचखोरीची अडीच पटीने झेप!

लाचखोरीची अडीच पटीने झेप!

Next

संतोष वानखडे / वाशिम
राज्यात लाचखोरीचा आलेख गतीने झेपावत असल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये राज्यात ४५ सापळे यशस्वी झाले होते. याऊलट नोव्हेंबर २0१४ मध्ये तब्बल १११ सापळ्यातून १४४ लाचखोरांना आरोपी करण्यात आले आहे.
झटपट श्रीमंत होण्याच्या स्पर्धेने प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता कधीचीच गायब झाली. लाचखोरी आणि भ्रष्टाचार देशाची अर्थव्यवस्था पोखरत आहे. याविरोधात अनेकवेळा आवाज उठविण्यात आला; मात्र लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याचा अनुभव घरातून बाहेर पडल्यावर अनेकांना पदोपदी येत आहे. ह्यलाचेह्णच्या मागणीला कंटाळून किंवा लाचखोरांना धडा शिकविण्यासाठी अर्जदार हा अँन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार नोंदवितो. प्राप्त तक्रारीवरून आतापर्यंत हजारो जणांवर लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत. नोव्हेंबर २0१३ या एका महिन्यात प्राप्त तक्रारींवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात ४५ कारवाया यशस्वी करून ५७ लाचखोरांना जेरबंद केले होते. या आकडेवारीची तुलना नोव्हेंबर २0१४ या एका महिन्याशी केली असता, लाचखोरीत तब्बल अडीच पट वाढ झाल्याचे स्पष्ट होते. नोव्हेंबर २0१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १११ कारवाया करून १४४ लाचखोरांविरूद्ध गुन्हे दाखल केले.

*डिसेंबरमध्ये आठ पट वाढ..
१ ते ३ डिसेंबर या तीन दिवसाची तुलना करता, २0१३ च्या तुलनेत २0१४ मध्ये तब्बल आठ पट वाढ झाल्याचे दिसून येते. १ ते ३ डिसेंबर २0१३ मध्ये राज्यात केवळ दोन कारवाया यशस्वी झाल्या होत्या. दोन कारवायामधून तिघांना जेरबंद केले होते. १ ते ३ डिसेंबर २0१४ मध्ये तब्बल १६ कारवाया करण्यात आल्या असून २0 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची साक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आकडेवारी देत आहे.

*अमरावती विभागात दुपटीने वाढ
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१३ आणि १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१४ या दरम्यानच्या तुलनात्मक आकडेवारीवर नजर टाकली तर लाचखोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट होते. १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१३ यादरम्यान अमरावती विभागात लाचखोरीच्या एकूण ६0 कारवायांची नोंद आहे. १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१४ यादरम्यान लाचखोरीच्या तब्बल १२६ प्रकरणांची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दप्तरी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३४ प्रकरणांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. त्याखालोखाल अमरावती २७, अकोला २४, बुलडाणा २२ तर वाशिम जिल्ह्यात १९ कारवाया करण्यात आल्या.

Web Title: Twenty-two-and-a-half-time jump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.