दोन दिवस पुरेल एवढाच बारदाना!
By admin | Published: April 5, 2017 08:07 PM2017-04-05T20:07:50+5:302017-04-05T20:07:50+5:30
अकोला: नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रांवर दिवस पुरेल एवढाच बारदाना असल्याने, तूर खरेदी पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.
तूर खरेदी पुन्हा रखडण्याची शक्यता: तूर खरेदीची वेळ वाढविण्याची मागणी
अकोला: नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रांवर दोन हजार कट्टेच शिल्लक असल्याने, दोन दिवसातच बारदाना संपणार असल्याने, तूर खरेदी पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. बारदाना आलेला असुन, परंतु नाफेडला अद्यापपर्यंत बारदाना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शुक्रवारपर्यंतच तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. बारदाना उपलब्ध करून तूर खरेदीची वेळ रात्री ८ वाजेपर्यंत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गत काही दिवसांपासून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जिनिंगमध्ये नाफेड अंतर्गत तूर खरेदी सुरू आहेत. परंतु तूर खरेदीमध्ये सातत्याने बारदान्याचा व्यत्यय येत आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, नाफेड खरेदी केंद्रावरील तूर खरेदी थांबत आहे. २0 मार्चपासून बारदान्याअभावी तुर खरेदी थांबली होती. २९ मार्चला बारदाना आल्यानंतरच तूर खरेदीस सुरूवात झाली. सद्यस्थितीत १५ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतिक्षेत आहेत आणि सध्या नाफेडकडे ५0 किलो वजनाचे दोन हजार कट्टेच शिल्लक आहेत. दोन दिवस हा बारदाना पुरेल. परंतु नंतर बारदान्याअभावी तूर खरेदी थांबण्याची शक्यता आहे. बारदाना आलेला असतानाही नाफेडला अद्यापपर्यंत बारदाना प्राप्त झालेला नसल्याची माहिती आहे.