दोन वर्षांपासून फरार 'मकोका'चे दोन आरोपी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:38 PM2019-01-04T12:38:49+5:302019-01-04T12:39:42+5:30

अकोला: जुने शहरातील विकी खपाटे हत्याकांडातील मकोका लावलेले आरोपी दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर हे दोन आरोपी गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात अडकले.

 Two absconding accused arested | दोन वर्षांपासून फरार 'मकोका'चे दोन आरोपी जेरबंद!

दोन वर्षांपासून फरार 'मकोका'चे दोन आरोपी जेरबंद!

Next

अकोला: जुने शहरातील विकी खपाटे हत्याकांडातील मकोका लावलेले आरोपी दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर हे दोन आरोपी गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात अडकले. या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी त्यांना अमरावती येथील विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येईल.
जुने शहरातील विकी खपाटे याची वर्चस्वाच्या वादातून २६ जून २0१७ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम ३0२, १४३, १४७, १४८, १४९, १२0 (ब) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता; परंतु घटनेपासूनच आरोपी चेतन साहू (रा. हरिहरपेठ), गुंजन सूरज कावळे (रा. बाळापूर नाका) व बंटी सटवाले हे फरार झाले होते. दोन वर्षांपासून तिघेही पोलिसांना गुंगारा देत होत होते. दरम्यान, पोलिसांनी बंटी सटवाले याला अटक केली होती; परंतु साहू व कावळे हे दोघे फरारच होते. गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाला आरोपी अकोल्यात असल्याची माहिती मिळाली. पथकाने रिधोराजवळ एका हॉटेलजवळ छापा टाकू न चेतन साहू व गुंजन कावळे यांना अटक केली. ही कारवाई विशेष पथकाचे पीएसआय तुषार नेवारे, विनय जाधव, राज चंदेल, मनोज ठोसर, मकोका गठित पथकाचे पीएसआय चंद्रकांत ठोंबरे व रवी घिवे यांनी केली. पुढील कारवाईसाठी आरोपींना जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)
 

 

Web Title:  Two absconding accused arested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.