आकीब खुन प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद
By admin | Published: June 22, 2016 12:10 AM2016-06-22T00:10:09+5:302016-06-22T00:10:09+5:30
पाच आरोपी अद्यापही फरार, पोलिसांकडून शोध सुरु
अकोला - पोलिसांच्या खबर्या असल्याच्या संशयावरुन हमजा प्लॉटमध्ये झालेल्या शेख आकीब खुन प्रकरणातील सात आरोपींपैकी २ आरोपींना बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आले. मात्र या खुन प्रकरणातील पाच आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
वाशिम बायपास रोडवरील हमजा प्लॉटमध्ये नवाबपुरा येथील रहिवासी शेख आकीब शेख आरीफ याच्यावर सात जनांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवीला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकीबला सवरेपचार रुग्णालयात नेण्यात येत असतांनाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात जनांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फीरोज, शेख हसन आणि शेख रियाज या साम जनांचा समावेश आहे. जुने शहर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केल्यानंतर यामधील शेख कासम आणि शेख मजीद या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
मृतदेह नेण्यावरुन हल्लकल्लोळ
शेख आकीब शेख आरीफ याच्या मृतदेहाचे मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शेख आकीबचा मृतदेह घेउन जात असतांना काहींनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने आंदोलनकर्त्यांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्यांच्यावर करडी नजर ठेवल्याने आंदोलनाच्या तयारीत असलेल्यांचा हा डावही फसला. त्यामूळे मृतकाच्या काही नातेवाईकांनी सवरेपचार रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर हल्लकल्लोळ केला. मात्र परिविक्षाधीन शहर पोलीस अधीक्षक सचिन सांगळे, शहर पोलिस अधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्यासह शहरातील सर्वच ठानेदार घटनास्थळावर दाखल झाले. त्यामूळे मृतदेह थेट स्मशानभुमीमध्ये नेण्यात आला.