दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त

By admin | Published: April 4, 2015 02:00 AM2015-04-04T02:00:49+5:302015-04-04T02:00:49+5:30

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गत दोन वर्षांत १३00 कारवाया; १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल.

Two-and-a-half-million tonnes of foodgate seized | दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त

दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त

Next

बुलडाणा : समाजातील प्रत्येकस्तरातील घटकास अन्नधान्य मिळावे, या उद्देशाने शासनाकडून गोर गरिबांना स्वस्त दरात धान्य वाटप केले जाते; मात्र या अन्नधान्याची साठेबाजी व काळाबाजार मोठय़ा प्रमाणात होतो. यावर अंकुश लावण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गत दोन वर्षात राज्यभरात जवळपास १३00 कारवाया केल्या. या कारवायांमध्ये कोट्यवधीचा धान्यसाठा जप्त करुन १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही स्वस्त धान्य दुकानदार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही, स्वत:च्या मर्जीने लाभार्थी निवडतात, मयत व परगावी असणार्‍या लोकांची बोगस नावे घालतात, शिवाय अन्नधान्याची साठेबाजी केली जाते. या गैरव्यवहाराबाबत प्राप्त ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने अवैध धान्यसाठा करणार्‍यांविरुद्ध विविध जिल्ह्यात धाडसत्र राबविले. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये साठेबाजी व काळाबाजार करणार्‍यावर २0१३ आणि २0१४ या दोन वर्षात १ हजार ३७८ धाडी घालण्यात आल्या. या कारवाईत गुन्हे नोंद करुन १ हजार ९८५ लोकांना अटक करण्यात आली. १ हजार ३२९ लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

*पेट्रोल व गॅस सिलेंडरचा काळाबाजार

      मागील काही वर्षांपासून रॉकेल, पेट्रोल आणि गॅस सिलींडरचा काळाबाजार करणार्‍यांवर राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई केली. यात ३८ लाख रुपये किंमतीचे पेट्रोल, ७३ लाख रुपयांचे डिझेल, २ कोटी ४९ लाख रुपयांचे १६ हजार गॅस सिलींडर जप्त करण्यात आले.

Web Title: Two-and-a-half-million tonnes of foodgate seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.