बळकावलेल्या संस्थेच्या आधारे दोन आश्रमशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:55 AM2017-11-21T01:55:52+5:302017-11-21T01:58:25+5:30
अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि सोलापूर, सांगली व मुंबई येथील १५ लोकांनी बळकावलेल्या या संस्थेवर सोलापूर जिल्हय़ात प्राथमिक निवासी आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांवर अनुदानही मिळविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि सोलापूर, सांगली व मुंबई येथील १५ लोकांनी बळकावलेल्या या संस्थेवर सोलापूर जिल्हय़ात प्राथमिक निवासी आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांवर अनुदानही मिळविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५ सहकार्यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान रजिस्टर्ड क्रमांक २२५६/एकेएल ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संस्था बळकावल्याचे निदर्शनास येताच संस्थापक सभासदांना धक्का बसल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या किचकट प्रकरणी चौकशीस प्रारंभ केला असून, संस्थापक संचालकांचे बयान नोंदविले आहेत. सहायक धर्मादाय आयुक्तांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, सदर संस्थेवर सोलापूर जिल्हय़ात २0१0 मध्ये दोन आश्रमशाळा अनुदानावर घेण्यात आलेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक माध्यमिक आश्रमशाळा असून, दुसरी प्राथमिक निवासी आश्रमशाळाही कार्यरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दोन आश्रमशाळांना लाखोंचे अनुदान
या दोन आश्रमशाळांवर २९ लाख रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेण्यात आले आहे. दरवर्षी किती अनुदान घेण्यात आले, याचा सविस्तर तपशील.
विधिज्ञाच्या सहायकाकडून सेटिंगचे प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या संस्थापक सचिवासह संचालकांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर एका विधीज्ञाच्या साहायकाकडून संस्थापक संचालकांना पैशाचे आमीष देउन प्रकरण सेटींग करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.