दोन ‘बीडीओ’ कोरोनाबाधित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:17+5:302021-02-24T04:20:17+5:30
अकोला : जिल्ह्यातील दोन गटविकास अधिकारी (बीडीओ) कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामुळे त्यांच्याकडील ‘बीडीओ’ पदांचा प्रभार अन्य ...
अकोला : जिल्ह्यातील दोन गटविकास अधिकारी (बीडीओ) कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामुळे त्यांच्याकडील ‘बीडीओ’ पदांचा प्रभार अन्य अधिकाऱ्यांकडे देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. अकोला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी तसेच अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यासंदर्भात मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती प्राप्त झाली. दोन पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने, त्यांच्याकडील गटविकास अधिकारीपदाचा प्रभार अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी सांगितले. जिल्हा परिषद अर्थ विभागातील एक कर्मचारी आणि अकोला पंचायत समितीमधील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला होता, हे येथे उल्लेखनीय.