कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By Admin | Published: January 19, 2017 02:19 AM2017-01-19T02:19:31+5:302017-01-19T02:26:47+5:30

वडी येथील घटना; दोन जखमी

Two bikers killed in a car crash | कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

googlenewsNext

जऊळका रेल्वे, दि. १८- टोयाटो क्वॉलीस कारने दोन दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दोन्ही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जऊळका रेल्वे ते अमानवाडी रोड असलेल्या वडी या गावाजवळ घडली.
एम.एच.१५ एएस ३६३९ क्रमांकाची टोयाटो क्वॉलीस कार अमानवाडीकडून जऊळका रेल्वेकडे येत होती, तर एम.एच.३७ सी.८९६१ व एम.एच.३७ एस १२२३ क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या दुचाकी जऊळका रेल्वे येथून अमानवाडीकडे जात होत्या. एम.एच.३७ सी.८९६१ या दुचाकीवर मनोहर करवते रा.अमानवाडी व संतोष ठाकरे रा. मुसळवाडी आणि एम.एच. ३७ एस १२२३ या दुचाकीवर सखाराम इंगळे व त्याचा मुलगा शैलेश इंगळे हे दोघे बापलेक होते. वडी या गावाजवळच्या वळणावर टोयाटो कारने या दोन्ही दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये संतोष ठाकरे (४५) व सखाराम इंगळे हे दोघे जागीच ठार झाले, तर मनोहर करवते व शैलेश इंगळे हे जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता, की टोयाटो कारने जबरदस्त धडक मारल्यामुळे दोन्ही दुचाकीचा चुराडा होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेकल्या गेल्या. जखमीस मालेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. टोयाटो कार ही मालेगावनजीक किन्ही येथील असून, या गाडीचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेमुळे जऊळका, अमानवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two bikers killed in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.