लोहारा येथे दोन घरफोड्या; लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:56 PM2019-04-30T16:56:34+5:302019-04-30T18:10:05+5:30
लोहारा : अज्ञात चोरट्यांनी लोहारा येथे रविवारी हैदोस घालत दोन घरांमध्ये धाडसी चोरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : अज्ञात चोरट्यांनी लोहारा येथे रविवारी हैदोस घालत दोन घरांमध्ये धाडसी चोरी केली. चोरट्यांनी दोन्ही घरांमधील सोन्याच्या दागिण्यासह २.८६ लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद् गुन्हा दाखल केल आहे.
लोहारा येथील माजी उपसरपंच हिंमतराव तायडे हे रविवारी रात्री उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यांच्या घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाटातील सोन्या चांदीच्या दागीन्यांसह इतर एवज साहित्य असा दोन लाख ८६ हजारांचा एवज लंपास केला.तायडे हे सकाळी घरामध्ये आले असता त्यांना कपाट तुटलेले आढळले. तायडे यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अन्सार देशमुख यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागीने व २० हजार रुपये रोख लंपास केले.चोरट्यांनी चोरी केल्यानंतर त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली. घटनेची माहिती मिळताच पो.स्टे.उरळ चे ठाणेदार सतीश पाटिल, पोउपनि.के.झेड मावस्कर, बीट जमादार संजय वानखडे यांनी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच अकोल्यावरून आयकेअरकार व श्वान पथक दाखल झाले. याप्रकरणी फियार्दी हिंमतराव तायडे तसेच अन्सार देशमुख यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवी कलम ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.एकाच रात्री दोन घरांमध्ये घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.