घरफोड्या दोन; गुन्हा दाखल मात्र एकच

By admin | Published: May 19, 2014 10:28 PM2014-05-19T22:28:42+5:302014-05-19T23:07:15+5:30

अकोला येथे दोन ठिकाणी घरफोडी झाली परंतु खदान पोलिसांनी एकच गुन्हा दाखल केला जातो.

Two burglars; Only one file is filed | घरफोड्या दोन; गुन्हा दाखल मात्र एकच

घरफोड्या दोन; गुन्हा दाखल मात्र एकच

Next

अकोला: गोरक्षण रोडवरील निवारा कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून अनुक्रमे ७ लाख ९0 हजार आणि ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला; परंतु खदान पोलिसांनी ६ लाख रुपयांची घरफोडीसुद्धा ७३ हजार रुपयांच्या घरफोडीच्या तक्रारीत समाविष्ट करून एकच गुन्हा दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्ह्याची संख्या कमी करण्यासाठी अनेकदा पोलिस ठाण्यांमध्ये असा पराक्रम केला जातो. गोरक्षण रोडवरील निवारा कॉलनीमध्ये राहणारे भोजराज चव्हाण हे कुटुंबासमवेत लग्नसमारंभानिमित्त वाशिमला गेले होते. रविवारी परत आल्यावर त्यांना त्यांच्या घरामध्ये घरफोडी झाल्याचे कळले. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले ७ लाख ८0 हजार रुपयांचे सोने व चांदीच्या दागिन्यांसह रोख १0 हजार लंपास केले. तसेच अज्ञात चोरट्यांनी रमेश लांडे यांच्या घरा घरफोडी करून कपाटात ठेवलेले ३२ ग्रॅमचे सोन्याचे, १00 ग्रॅमचे चांदीचे दागिने, तसेच कपाटातील १0 हजार ५00 रुपयांची रोखही लंपास केली होती. चोरट्यांनी एकूण ७३ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केला. लांडे यांच्यासोबत भोजराज चव्हाण यांनीसुद्धा रविवारी उशिरा रात्री खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंतु रमेश लांडे यांच्या तक्रारीमध्येच त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचा उल्लेख करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन घरी चोरी झाल्यानंतरही पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल न करता, एकच गुन्हा दाखल केला.

Web Title: Two burglars; Only one file is filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.