दोन कुटाराचे गोठे जळून खाक
By admin | Published: April 21, 2017 01:46 AM2017-04-21T01:46:03+5:302017-04-21T01:46:03+5:30
बोरगाव मंजू : अकोला तालुक्यातील अनकवाडी येथील गावाबाहेरील असलेल्या खुल्या जमिनीतील गवताला २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली.
बोरगाव मंजू : अकोला तालुक्यातील अनकवाडी येथील गावाबाहेरील असलेल्या खुल्या जमिनीतील गवताला २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत जनावरांचे दोन गोठे कुटारासह जळाले. गावातील जनतेच्या सतर्कतेने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अनकवाडी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. त्याच्यालगत खुली जमीन आहे. तेथे वाळलेले गवत व कचरा पडलेला होता. त्याला अचानक आग लागली.
ती झपाट्याने पेट घेत जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेपर्यंत पोहोचली. त्या परिसरात गावातील परमदेव चिपडे व जीवन अंकुरकार यांचे जनावरांचे गोठे होते. त्यात फक्त जनावरांचे कुटार भरलेले होते. या आगीत ते कुटार पूर्णपणे जळून खाक झाले. सदर आग गावात पोहोचू नये, यासाठी गावातील नागरिकांनी घरातील पाण्याच्या साठ्याचा वापर करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु, वाढती आग पाहून बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळावर अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत मिळाली व कुठलीही जीवित हानी झाली नाही. सदर आग विझविण्यासाठी गावातील महिला-पुरुषांनी तीव्र उन्हात पुढाकार घेतल्यामुळे मोठी हानी टळली.