विजेचा शॉक लागून दोन गायी ठार
By admin | Published: July 3, 2017 08:15 PM2017-07-03T20:15:40+5:302017-07-03T20:24:23+5:30
विवरा: येथे विजेचा शॉक लागून दोन गायी ठार झाल्याची घटना ३ जुलै रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विवरा: येथे विजेचा शॉक लागून दोन गायी ठार झाल्याची घटना ३ जुलै रोजी घडली.
विवरा गावात रस्त्याला लागून असलेल्या विद्युत रोहित्राच्या खांबामध्ये वीज प्रवाह आला. या खांबाजवळून जात असलेल्या चार ते पाच गायी विद्युत प्रभाराने ओढल्या गेल्या. यातील दोन गायी जागीच ठार झाल्या तर इतर फेकल्या गेल्या. गावातील प्रवीण किरतकार व रमेश शिंदे यांच्या मालकीच्या या गायी होत्या. या घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांना वीज वितरण कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
नियमित कर्मचारी देण्याची मागणी
विवरा येथे नियमित वायरमन नसल्याने गावातील तरुणच विजेची कामे करतात. त्यामुळे अपघात होण्याची व जीवित हानीची शक्यता नाकारता येत नाही. सात हजार लोकवस्ती असलेल्या या गावात कायमस्वरूपी वायरमन नसल्याने अनेक वेळा दहा दहा तास वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे गावासाठी नियमित कर्मचारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.